E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
14 May 2025
सिंदूर
सीता सांगे हनुमंता
सिंदुराची महानता
वाढे आयुष्य रामाचे
हा भांगात मी भरता
एक लकीर शेंदरी
देई सौभाग्याचे दान
कुल यथास्थित ठेवी
असा सिंदूराचा मान
लाभो दिर्घांयू पतीस
हेच सिंदूराचे सार
त्रिभुवनी मानतात
हाच खरा अलंकार
गाथा शेंदरी ऐकून
झाले हनुमंत थक्क
क्षणभरात फासला
सिंदूर स्वतःला चक्क
हनुमंत म्हणे माते
हाच मिरवीन रंग
जो देई माझ्या प्रभूस
दिर्घायुष्याची उमंग
रामा शिवाय जीवन
मज नकोच गे माते
केले शेंदराशी पक्के
माझ्या जीवनाचे नाते
सीता म्हणे अभ्युत्थान
वचन हनुमंतांचे
शक्ती सिंदूरास देणे
हे काम भगवंताचे
चिमूटभर सिंदूर
परी विश्वास अफाट
निरंतर सांभाळतो
हिंदूत्वाचा थाटमाट
पुन्हा एकदा सिंदूर
आज शत्रूशी भिडला
झाले यशस्वी मिशन
नवा इतिहास घडला
- प्राची गडकरी, डोंबिवली
मो. ९९८७५६८७५०
--
भिजत घोंगडी
पुन्हा अमेरिकेची मध्यस्थी
पुन्हा शस्त्रसंधी
पुन्हा पाकड्यांची लबाडी
पुन्हा अतिरेक्यांच्या झुंडी
पुन्हा युद्धायुद्धी
पुन्हा अमेरिकेची मध्यस्थी
पुन्हा शस्त्रसंधी
पुन्हा पाकड्यांची लबाडी
पुन्हा अतिरेक्यांच्या झुंडी
वाळायची कधी ही भिजत घोंगडी
- अनिल वसंत दीक्षित, (सारंगनील)
मो : ९९२२६१३३७५
--
व्याख्याच वेगळ्या आहेत ’श्रीमंती’च्या.
घरात दररोज ताजी फळं, फुलं, भरपूर दूध, दही असणं म्हणजे...’श्रीमंती’.
आज अवचित पाहुणा दारात आला आणि मी त्याला पोटभर जेवू घालू शकलो तर, ...मी ’श्रीमंत’ आहे.
माझी सहज आठवण आली म्हणून एखाद्या मित्राचा, नातेवाईकाचा फोन आला तर, ...मी ’श्रीमंत’ आहे.
कुणीतरी अडचणीत आहे, मदतीसाठी माझी आठवण आली तर, ...मी नक्कीच ’श्रीमंत’.
कुणाचे तरी विश्वासपात्र असणे म्हणजे... ’श्रीमंती’.
भर उन्हात फुललेला गुलमोहोर, फुललेली झाडे दिसावी म्हणजे... नजरेची ’श्रीमंती’.
थंडीत मस्त फुले अंगणभर पडावीत तर कधी पारिजातकाचा सडा, सोनचाफ्यांची फुले पडावी आणि त्यांच्या सुगंधानें सबंध अंगण भरून जावं ही ’श्रीमंती’.
थंडीच्या गारठ्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुक्यात फुलांचा सुगंध तृप्त, मदमस्त करून जावा, ...हीच ’श्रीमंती’.
होय. मला अशीच ’श्रीमंती’ हवी आहे.
अशी ’श्रीमंती’ आपल्या सर्वांनाही लाभावी.
Related
Articles
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारताच्या सामर्थ्यात होणार आणखी वाढ
29 May 2025
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारताच्या सामर्थ्यात होणार आणखी वाढ
29 May 2025
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारताच्या सामर्थ्यात होणार आणखी वाढ
29 May 2025
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारताच्या सामर्थ्यात होणार आणखी वाढ
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी